स्थूलत्व आणि मधुमेह मुक्त

विश्व अभियानात

आपले स्वागत आहे

ADORE

Association for Diabetes and Obesity REversal

अतिस्थूलता आणि मधुमेह निर्मुलन समिती

लठ्ठपणा व मधुमेहमुक्त भारत ” या अभियानाची छोटीशी सुरुवात २०१३ साली झाली. त्यावेळी हे सर्व विविध शहरात छोट्या समूहांना डॉ दीक्षित यांची व्याख्याने इथपर्यंतच सीमित होते. लोकं एस एम एस व ई-मेल द्वारे जोडले गेले होते. २०१५ साली पहिल्यांदा सोशल मीडियाचा वापर करण्याची संकल्पना पुढे आली. एक फेसबुक ग्रुप, एक फेसबुक पेज व काही व्हाट्सअप्प ग्रुप ने सुरुवात झाली. २०१५ वर्ष अखेरपर्यंत दहा हजार लोक या अभियानाशी जोडले गेले. हळूहळू संपर्क जाळे पसरत गेले, आजमितीस ३६ देशांतील जवळपास ३५ हजार लोक थेटपणे जोडले गेले आहेत. डॉ दीक्षित यांची व्याख्याने युट्युब वर टाकणे हा या अभियानातील महत्वाचा टप्पा होता. जगभरातील लाखों लोक,  डॉ दीक्षित यांची मराठी, इंग्रजी व हिंदीतील व्याख्याने ऐकून त्यात सुचवलेल्या सहजसोप्या व परिणामकारक जीवनशैलीचा अंगिकार करून, या अभियानाशी अप्रत्यक्षपणे जोडले गेले. आमचे प्रणेते स्व. श्रीकांत जिचकार यांच्या २ जून २०१८ या पुण्यतिथी दिवशी या अभियानाचे नामकरण “लठ्ठपणा व मधुमेहमुक्त विश्व” असे केले गेले. आज हे अभियान साठ पेक्षा अधिक समन्वयकांच्या निस्वार्थ सेवाभावी योगदानामुळे अत्यंत वेगाने मार्गक्रमण करत आहे. यांत विविध पॅथीमधील डॉक्टर्स तसेच अनेक गैर वैद्यकीय क्षेत्रांतील लोकांचा समावेश आहे.

ही पद्धती सर्वांसाठी उपयोगी आहे कारण...

शास्त्रीय बैठक

उच्च प्रमाणातील स्वादुस्त्रावामुळे होणारा लठ्ठपणा तसेच स्वादुस्त्राव प्रतिरोध हा सर्वश्रुत आहे. या अभियानात सुचवलेला जीवनशैली बदल हा स्वादुस्त्राव पाझर, त्याचे कार्य व परिणाम यांच्या शास्त्रीय तथ्यांशी सुसंगत आहे. शरीरातील स्वादुस्त्रावाची पातळी कमी केल्यामुळे अनेक फायदे होतात. स्वादुस्त्रावाची पातळी कमी ठेवण्यासाठी एकमेव परिणामकारक व  शाश्वत मार्ग म्हणजे कमी वेळा खाणे.

आचरणात आणण्यास सोपी

खालील वैशिष्ठयांमुळे तो आचरणास सहज सोप्पा बनतो:
●आपणांस पैसे खर्च करण्याची गरज नाही.
● आपल्याला कोणत्याही डॉक्टर किंवा तज्ज्ञाशी सल्लामसलत करण्याची गरज नाही.
● कोणतेही यंत्र खरेदी करण्याची गरज नाही.
● कोणत्याही कृत्रिम आहार पुरकांची गरज नाही
● आणि महत्वाचे म्हणजे आपण ह्याचे पालन आयुष्यभर करू शकतो.

अनेकांना याचा फायदा झाला आहे!

विनासायास स्थूलत्व मुक्ती आणि मधुमेह प्रतिबंध करण्यासाठी जीवन शैलीमध्ये  बदल करून आजपर्यंत हजारो लोकांनी त्यांचे वजन घटवले आहे , शेकडो पूर्व-मधुमेही मधुमेहमुक्त झाले आहेत. मधुमेहींच्या बाबतीत त्यांच्या औषधांचे डोस कमी किंवा बंद झाले आहेत. त्यातील काही यशोगाथा तुम्ही येथे वाचू शकता.

जीवनशैली मुळे होणाऱ्या रोगांवरील उपचार हा जीवनशैली बदलातच शोधला पाहिजे, औषधांत नव्हे!

आमचे प्रणेते

स्व. डॉ. श्रीकांत जिचकार

MBBS, MD, D Litt
IAS, IPS
माजी खासदार  (राज्यसभा)

स्व. डॉ. श्रीकांत जिचकार

आमच्या अभियानाचे प्रणेते स्व श्रीकांत जिचकार हे एक प्रतिभासंपन्न, अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेले व्यक्तिमत्व होते. ते डॉक्टर तर होतेच त्याच बरोबर समाज सुधारक , कुशल प्रशासक व राजकारणीही होते, त्यांची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये देशभरातील विविध विद्यापीठांतून सर्वात जास्त उच्च महाविद्यालयीन पदवीधारक म्हणून नोंद होण्याचा सन्मान प्राप्त झाला होता. ते भारतीय प्रशासकीय सेवा तसेच भारतीय पोलीस सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले होते. अत्यंत कमी वयातच ते महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य झाले तसेच अपवादात्मक परिस्तिथीत आमदार म्हणून निवडून येण्या आधीच मंत्री म्हणून शपथविधी झाला! कडक शिस्तीची कार्यकुशलता, संभाषण चातुर्य व विलक्षण बुद्धिमत्ता या जोरावर त्यांनी समाजकारणात सर्व स्तरांवर अधिराज्य गाजवलं. क्षेत्र कोणतेही असो, धर्म, अर्थशारत्र, राजकारण, वैद्यकीय किंवा तत्वज्ञान सर्व ठिकाणी त्यांचा प्रभाव दिसून आला. त्यांनी या राज्यात तसेच देशभरातील लोकांना निरोगी जीवनशैली आचरणात आणून रोगमुक्त होऊन शंभर वर्षे जगण्यासाठी मार्गदर्शन केले.
त्यांनी भारतात  प्रथमच “कार्बो-इन्सुलिन संबंध” विषयीची संकल्पना मांडली. त्यांनी त्यावेळी केलेल्या कामातच आमच्या अभियानाचे मूळ दडलेले आहे. आम्ही या दंतकथात्मक व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली वाहतो!

आमचे मार्गदर्शक

dr-jagannath-dixit-web

डॉ. जगन्नाथ दीक्षित 

डॉ जगन्नाथ दीक्षित

डॉ जगन्नाथ दीक्षित,  MBBS MD (विभाग प्रमुख, जनऔषध वैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर) एकनिष्ठ व समर्पित वैद्यकीय प्रशिक्षक, ज्यांना वैद्यकीय महाविद्यालयात शिकवण्याचा २८ हुन अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी या जीवनशैली बदला मुळे स्वतः ला झालेला विस्मयकारी फायदा बघून  या अभियानाचा शुभारंभ केला. त्यांनी क्रीडा, समाजकारण व वैद्यकीय क्षेत्रात प्राविण्य मिळवले आहे. विलक्षण वक्तृत्व कला चातुर्य, समाजातील गरीब व गरजू लोकांना मदत करण्याची तळमळ या जोरावर त्यांनी हजारो लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. स्व डॉ जिचकार यांनी सुरू केलेले कार्य पुढे नेण्याचे शिवधनुष्य समर्थपणे पेलले आहे.

विशेषज्ञांच्या प्रतिक्रिया

आपण लिहिलेल्या, ‘विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध’ या पुस्तकाबद्दल आपले  हार्दिक अभिनंदन! सर्वसामान्य माणसाला सहज समजेल अश्या साध्या-सोप्या भाषेत तुम्ही हे पुस्तक लिहिले आहे.  शास्त्रीय ज्ञान व व्यवहारात पाळता येण्याजोगे साधे उपाय यांचा हे पुस्तक म्हणजे सुंदर मिलाफ आहे.
भारतीय जीवन शैलीशी निगडित अश्या विविध आजारांमधील इन्सुलिन रेझिस्टन्सची भूमिका सर्वज्ञात आहे. इन्सुलिन रेझिस्टन्सचा प्रतिबंध  करण्यासाठी या पुस्तकात सुचवलेला साधा, व्यवहार्य व बिनखर्चिक उपाय अतिशय परिणामकारक असा आहे. अखेरीस, अतिरिक्त उष्मांक टाळल्याने शरीरात चरबीची साठवण होणार नाही व व्यक्तीला निरोगी आयुष्य जगता येईल

डॉ तुषार बंडगर

एम डी ( जनरल मेडिसिन) डी एम (एंडोक्रिनोलॉजी) सल्लागार मधुमेहतज्ज्ञ व एन्डोक्रिनोलॉजिस्ट
प्राध्यापक व विभागप्रमुख, एन्डोक्रिनोलॉजि विभाग, शेठ जी एस वैद्यकीय महाविद्यालय व के इ एम इस्पितळ, मुंबई

लठ्ठपणा व मधुमेहमुक्त विश्व” या स्तुत्य सामाजिक उपक्रमातील योगदानाबद्दल डॉ दीक्षित यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांच्या डाएट प्लॅनच्या तंतोतंत पालनाने अनेकांना अद्भुत यश मिळाले आहे.
मी स्वतः व्यग्र स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने दैनंदिन कामात अनेक पी.सी.ओ. डी. ने ग्रस्त असलेल्या सर्व वयोगटातील महिला माझ्या पाहण्यात येतात. लठ्ठपणा या आजारात आगीत तेल ओतण्याचे काम करतो. डॉ दीक्षित सरांचे ‘विनासायास वेट लॉस’ हे पुस्तक वाचून आणि सरांचे व्याख्यान ऐकून मी माझ्याकडे येणाऱ्या मुल होण्यास अडचण असणाऱ्या, विशेषतः लठ्ठ आणि पी. सी.ओ. एस. असणाऱ्या महिलांसाठी , हा डाएट प्लॅन वापरण्यास ऑगस्ट २०१६ पासून सुरुवात केली.
डॉ दीक्षित सरांच्या सन्मानार्थ मी याचे ‘जे व्ही पद्धत’ असे नामकरण करणे आहे. माझ्या नोंदी व निरीक्षणांप्रमाणे प्रामाणिकपणाने हा डाएट प्लॅन पाळणाऱ्यांचे जवळजवळ ८-१० किलो वजन कमी झाले, शिवाय त्यातील काहींमध्ये औषधांविना नियमित बीजांडनिर्मिती होत आहे. चार-पाच महिन्यांनी मासिक पाळी येण्याऱ्यांमध्ये, त्यात नियमितपणा आला आहे ३०-४० पी.सी.ओ. डी च्या रुग्णांपैकी दोन जणी गर्भवती सुद्धा राहिल्या आहेत.
मला खात्री आहे की, या जे.व्ही. पद्धतीने नुसतेच वजन कमी झालेले नाही , तर नैसर्गिक हार्मोनल संतुलन प्रस्थापित झाले आहे.
या अभियानाच्या यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

डॉ वंदना गांधी

एम डी (स्त्रीरोग शास्त्र)
गांधी इस्पितळ, अकलूज

मी नंदुरबार येथील जनतेच्या सेवेत १९८२ पासून कार्यरत आहे.मी डॉ दीक्षित सरांचे व्याख्यान युट्युब वर ऐकले, त्यानंतर २२ जुलै २०१८ रोजी त्यांचे व्याख्यान नंदुरबार करांसाठी आयोजित करण्यासाठी मदत करू शकले. त्यांनी मांडलेल्या सिद्धांताने खूपच प्रभावित झाले आणि स्वतः त्याचे आचरण सुरू केले आणि त्याचे चांगले परिणाम मिळाले. मग मी माझ्या रुग्णांना हे सांगायला सुरुवात केली. मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की त्या रुग्णांचे वजन तर कमी झाले त्याच बरोबर मधुमेह प्रतिबंधक औषधांचे डोस कमी होऊन इन्सुलिनचे प्रमाणही कमी झाले. ह्या डाएट प्लॅनमुळे काही नंदुरबारकराचे वजन काही महिन्यांतच १० किलोपेक्षा कमी झाले आहे. डॉ दिक्षितांनी समाजाला दिलेला हा गुरुमंत्र अत्यंत प्रभावी आहे. प्रत्येकाने त्याचे प्रामाणिकपणे आचरण करून स्वास्थमय व निरोगी जीवन जगायला हवे! या अभियानाला माझ्या शुभेच्छा!

डॉ नूतन शाहा

एम. डी (मेडिसिन) , वरिष्ठ फिजिशियन, नंदुरबार

२२ जुलै २०१७ रोजी माझे वजन ७६ किलो व पोटाचा घेर ३८.५ इंच होता, मला एचबीए1सी ५.९६% व फास्टिंग इन्सुलिन ११.६ मुळे ‘पूर्व-मधुमेही’ असा शिक्कामोर्तब झाले. कर्मधर्म संयोगाने मी डॉ दीक्षित सरांचे चाळीसगांव येथील व्याख्यान ऐकले. त्यांनी सुचवलेल्या डाएट प्लॅन व व्यायामप्रकाराचे मी तंतोतंतपणे केले. १ जानेवारी २०१८ रोजी माझे वजन ६५.५ किलो तर पोटाचा घेर ३.५ इंचाने कमी होऊन ३५ इंचावर पोहोचला, महत्वाचे म्हणजे एचबीए1सी ५.६% झाल्यामुळे मधुमेहमुक्त झालो. या पुढे, उर्वरित आयुष्यात हा डाएट प्लॅन निरंतरपणे आचरणात आणण्याचे ठरवले आहे. मी माझ्या रुग्णांनाही या डाएट प्लॅनची शिफारस करायला सुरुवात केली आहे. हा डाएट प्लॅन केवळ मधुमेह प्रतिबंधासाठीच उपयुक्त नाही तर थायरॉईड व मासिक पाळीतील अनियमितता या साठीही उपयुक्त आहे. याने जीवन फक्त निरोगीच होत नाही तर आनंदी, तारुण्यमय व समृद्ध होते. ह्या डाएट प्लॅन चे पालन काटेकोरपणे करण्याऱ्या सदस्यांना ग्रुप वर तसेच व्यक्तिगत  पातळीवर, डॉ दीक्षित सरांकडून वेळोवेळी मिळणारे प्रोत्साहन हे अमूल्य आहे. ह्या अभियानात सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा सार्थ अभिमान आहे. डॉ दिक्षितांना हृदयपूर्वक धन्यवाद!

डॉ मुकुंद करंबेळकर

स्त्रीरोगतज्ज्ञ, चाळीसगाव

काही यशोगाथा

सकारात्मक विचारसरणीचा विजय! एका वर्षात 22.7 किलो वजन कमी झाले

सकारात्मक विचारसरणीचा विजय, एका वर्षात 22.7 किलो वजन कमी झाले माझी आनंददायी आहार योजना@एक स्वप्नपूर्ती न भूतो ना भविष्यती प्रवाससकारात्मक विचारसरणीचा विजय नमस्कार ,मी, श्री

Read More »

वीस वर्षांचा तीव्र मधुमेह आटोक्यात आला, इन्स्युलीन डोस बंद झाला

वीस वर्षांचा तीव्र मधुमेह आटोक्यात आला, इन्स्युलीन डोस बंद झाला मी रमेश वैद्य, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, वैद्य उद्योग समूह राहणार औरंगाबाद10 EWL DMवय – 68 वर्षमोबाईल

Read More »

स्वतःच्या जीवनातील बदलांचे साक्षीदार व्हा

या नि:शुल्क अभियानात सहभागी व्हा