ADORE Trust | Copyright 2021. All rights reserved | Contact: [email protected]
Designed by: Digital Canvas
मी रमेश वैद्य, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, वैद्य उद्योग समूह
राहणार औरंगाबाद
10 EWL DM
वय – 68 वर्ष
मोबाईल नंबर 9822034013
माझ्या एका मित्राने डॉ. जगन्नाथ दीक्षित ह्यांच्या मधुमेह आणि लठ्ठपणा निर्मूलन ह्या विषयावरची you tube link पाठवली.
मी खूप वेळा वरील व्हिडीओ लिंक बघितली आणि एके दिवशी दीक्षित सरांना फोन केला.
माझ्या सर्व तक्रारी आणि अडचणी शांतपणे ऐकल्यानंतर सरांनी मला आहारयोजनेचे पालन करण्याचा सल्ला दिला.
मी 1 मार्च 2018 पासून आहारयोजनेचे पालन करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी माझे वैद्यकीय अहवाल असे होते –
HbA1c – 6.8
उपाशीपोटी इन्सुलिन – 13.8
वजन – 87 किलो
पोटाचा घेर – 46.5 इंच
मी जवळजवळ 20 वर्षांपासून मधुमेही आहे. त्यासाठी मी घेत असलेली औषधे –
Janumet 100/1000 (सकाळी व रात्री 1-1)
Lantus Insulin – 16 units (रात्री)
तीन महिने आहारयोजनेचे पालन केल्यानंतर 1 जून 2018 चा वैद्यकीय अहवाल –
HbA1c – 6.7
उपाशीपोटी इन्सुलिन – 17.44
वजन – 77 किलो ( 10 किलो कमी)
पोटाचा घेर – 41.5 इंच ( 5 इंच कमी)
मधुमेहाच्या औषधांची मात्रा सुध्दा कमी झाली
Janumet 50/500 (सकाळी व रात्री 1-1) 50% घट
Lantus Insulin 0 units (रात्री) 100% घट
मी आहारयोजनेचे 90% पालन केले. माझ्या HbA1c आणि उपाशीपोटी इन्सुलिन पातळीत फारसा फरक पडला नाही उलट थोडी पातळी वाढली पण वजन आणि पोटाचा घेर ह्यातील घट अभुतपुर्व आहे.
ह्या आधी मी वजन आणि मधुमेह यावर नियंत्रण करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण व्यर्थ …
ह्यात आर्थिक नुकसान झालं ते वेगळंच !!
मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होतो की ह्या आहारयोजनेचा खूपच फायदा होतो आणि आयुष्यभर त्याचे पालन करण्यात कोणतीही अडचण नाही.
मी डॉक्टर दीक्षित आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. त्यांनी समाजामध्ये मधुमेह आणि लठ्ठपणा निर्मूलन यासंबंधी जागृती निर्माण केली आणि निसर्गाच्या सानिध्यात नेण्याचा प्रयत्न केला.
मी आणि माझे कुटुंबीय ह्या संबंधी जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहू.
ह्या मोठ्या कार्याचा एक छोटासा भाग असल्याचा मला अभिमान आहे.
धन्यवाद डॉ.दीक्षित
ADORE Trust | Copyright 2021. All rights reserved | Contact: [email protected]
Designed by: Digital Canvas