सकारात्मक विचारसरणीचा विजय, एका वर्षात 22.7 किलो वजन कमी झाले

ajinath-bhadake

माझी आनंददायी आहार योजना@एक स्वप्नपूर्ती

न भूतो ना भविष्यती प्रवास
सकारात्मक विचारसरणीचा विजय

नमस्कार ,
मी, श्री अजिनाथ बबन भडके
काम: प्राथमिक शिक्षक
पत्ता: रा. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर
वय: ३९ वर्षे
उंची: १६५ सेमी 
मोबाइल: ८८०५७५१९५४
१ ऑगस्ट २०१७ चे वजन ९२.७ फक्त.

मी या प्लॅनकडे कसा वळलो?:
माझा आवडता ड्रेस स्ट्रेचेबल जिन्स व शॉर्ट शर्ट रेडिमेड, पण गेली 3 वर्षापासून माझी कंबर 36 वरून 42 वर गेली तर शर्ट चा नंबर एक्स एल वरून ट्रिपल एक्स एल वर गेला समजलेच नाही. 
क्रिकेट हॉलीबॉल,फिरणे,पोहणे चालूच होते. व्यायामामुळे जेवणही वाढत होते बरोबरच वजनही प्रगतीपथावर होते. माझ्या मापाचे कपडेच दुकानात फारसे नसायचे त्यामुळे मला चॉईस ला कमी चान्सेस असायचे.
मी विविध आहार योजनेचा अभ्यास करून डॉ. जगन्नाथ दीक्षित सरांचा प्लॅन स्वीकारला.

माझे वजन १ नोव्हेंबर १७ रोजी ८५ किलो पर्यंत कमी झाले. पुढे प्लॅन सुरुच होता.

नंतर माझे वजन असे कमी झाले:
५ जानेवारी १८: ७९ किलो
१५ एप्रिल १८: ७३ किलो.
१ ऑगस्ट १८: ७० किलो.

एक वर्षात माझे वजन २२.७ किलो कमी झाले.

हा माझा वर्षभराचा प्रवास. कधीही कंटाळा नाही,आळस नाही,कसलाही त्रास नाही.
एकदम आनंदात,उत्साहात. योजनेचा आनंद घेत, .मित्रांना मार्गदर्शन करत.
खेळीमेळीच्या वातावरणात डॉ दीक्षित सर यांची आहार योजना १००% पालन करत आहे.

‘तूच आहेस तुझ्या वजनाचा शिल्पकार’ असे म्हणावेसे वाटते.

डॉ दीक्षित सरांचे आभार……धन्यवाद