ADORE Trust | Copyright 2021. All rights reserved | Contact: [email protected]
Designed by: Digital Canvas
ह्या अभियानाची छोटीशी सुरुवात २०१३ साली झाली. व्हाट्सअप, फेसबुक पेज व फेसबुक ग्रुप अश्या सोशल मिडिया चा वापर २०१५ पासून सुरू झाला
आजपर्यंत ३६ देशांतील ४५००० हजारांहून अधिक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट जोडले गेले आहेत. डॉ दिक्षितांची व्याख्याने लाखों लोकं ऐकतात, हजारोंच्या संख्येने लोकांनीं त्याचे वजन घटवले आहे, शेकडो मधुमेहींना फायदा झाला आहे! काहींच्या बाबतीत त्याचे मधुमेहाच्या औषधांचे डोस कमी झाले आहेत, काहींच्या बाबतीत तर ते बंद झाले आहेत!
महत्वाचे म्हणजे या अभियानामुळे जगातील सर्व अतिलठ्ठ व मधुमेहग्रस्त लोकांना एक आशेचा किरण दिसू लागला आहे! अशी भावना जागृत झाली आहे की ते आत्मविश्वासाने , स्वप्रयत्नाने निरोगी आयुष्य जगू शकतात! जे लोक पूर्वी रोज २ किमी सुद्धा चालू शकत नव्हते ते आता १० किमी किंवा २१ किमी मॅरेथॉन पळायची तयारी करत आहेत! ही सकारात्मकता समाजातील सर्व स्तरांवर दिसून येत आहे ज्या ठिकाणी आमचे सभासद आहेत
डायबेटिस रिवर्सल सेंटर्स
यातील एक सेंटर नागपूर येथे तर एक पुणे येथे सप्टेंबर २०१८ मध्ये सुरू होत आहे. याचा उद्देश मधुमेही रुग्णांची औषधे कमी करणे हा आहे! सुरुवातीला १०० रुग्णांची तुकडी ६ महिने ते १ वर्षांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल जो पर्यंत ते मधुमेहमुक्त होतील! या मोहिमेची व्याप्ती भविष्यात वाढवण्यात येईल!
शाळेतील मुलांसाठी कार्यक्रम
शाळेतील आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना लठ्ठपणा व मधुमेह टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली विषयी शिक्षण देण्यात येईल. जिल्हा परिषद शाळा तसेच खाजगी शाळांमधील शिक्षक हे प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षित केले जातील. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी सोपवली जाईल! हे कार्य प्रथम नाशिक जिल्ह्यात करण्यात येईल. या वर्षभरात २ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट्य आहे!
डॉ जे व्ही दीक्षित यांना २८ हून अधिक वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे, ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक तसेच जनौषधी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी १९९० साली प्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र या विषयात एम डी केले आहे व १९९१ मध्ये इस्पितळ व्यवस्थापन या विषयी पदव्युत्तर पदविका प्राप्त केली आहे तसेच १९९५ साली मानव संसाधन व्यवस्थापन या विषयावर पदव्युत्तर पदविका प्राप्त केली आहे.
त्यांच्या पुस्तके, वर्तमानपत्रे, रेडिओ, दूरचित्रवाणी या माध्यमातून स्वास्थ्य क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीसाठी त्यांना तीन राष्ट्रीय तसेच चार राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवलेले आहे!
त्यांना उत्कृष्ट शिक्षक (वैद्यकीय शिक्षण) तसेच २०१५-१६ साली महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या तर्फे डॉ शरदिनी डहाणूकर सर्वोत्कृष्ट शिक्षक या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
Dixit JV. Eating frequency and weight loss: results of 6 months follow up of a public health campaign at Aurangabad. International Journal of Clinical Trials 2014;1:67-9.
http://www.ijclinicaltrials.com/index.php/ijct/article/download/44/37
Dixit JV, Indurkar S. Effect of eating frequency on prediabetes status: a self controlled preventive trial. International Journal of Clinical Trials 2017;4(4):171-5.
http://www.ijclinicaltrials.com/index.php/ijct/article/download/231/126
Dixit JV. Effect of Eating Frequency on Diabetes: A Case Report from Latur City, India.
International Journal of Education and Research in Health Sciences, July-September 2017;3(3):184-186
http://www.journal.saiamrut.com/saj/showfile/showpdfarticle.aspx?id=95
Dixit JV. Eating frequency and fasting insulin levels: a case report from Aurangabad. Int J Health Sci Res. 2014;4(8):309-311.
http://www.ijhsr.org/IJHSR_Vol.4_Issue.8_Aug2014/48.pdf
Dixit JV. Diabetes, its treatment and prevention: Are we on the right path? (Editorial)
Al Ameen J Med Sci 2018; 11(2): 79-81
९ जून २०१८ रोजी गडकरी रंगायतन ठाणे येथील मराठी व्याख्यान
मानकुला विनायगा मेडिकल कॉलेज, पुडीचेरी येथील इंग्रजी व्याख्यान
औरंगाबाद येथील हिंदी व्याख्यान
मिलिटरी इंजिनीअरिंग कॉलेज, पुणे येथील इंग्रजी व्याख्यान
बेळगाव येथील मराठी व्याख्यान
बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे झालेले मराठी व्याख्यान
टिळक स्मारक मंदिर पुणे येथील मराठी व्याख्यान
प्रभू ज्ञान मंदिर पुणे येथील मराठी व्याख्यान
दयानंद ऑडिटोरिम, लातूर येथील मराठी व्याख्यान
विद्या प्रतिष्ठान, बारामती येथील मराठी व्याख्यान
ABP माझा वाहिनीवरील ‘माझा कट्टा’ कार्यक्रमातील चर्चा
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील मुलाखत
पुणे येथे झालेले मराठी व्याख्यान
नागपुरातील हिंदी व्याख्यान -1
नागपुरातील हिंदी व्याख्यान -2
मुंबई
श्री अरुण नावगे , अमोल भागवत
पुणे
डॉ वेदा नलावडे, डॉ संतोष धुमणे, अर्चना देवरस, शिल्पा उनकुले, दीपक कुलकर्णी, डॉ संगीता पंडित, शिल्पा घाटणेकर, बाळासाहेब कदम, मुक्ता गाडगीळ
औरंगाबाद
डॉ अंजली दीक्षित, डॉ सीमा दहाड, डॉ सुजाता लाहोटी, शिवशंकर स्वामी, ऍड उल्हास सावजी, सुरेखा सावजी, अनिता बाहेकर, डॉ शिल्पा तोतला
नागपूर
दीपाली बेंद्रे, राजू अकोलकर, डॉ वैदेही मराठे, हेमंत कालिकर, मिलिंद भालेराव. महेंद्र पेंढारकर, रीना साहा
ठाणे
रवी जगन्नाथन, माधवी जोशी, श्रीकांत नितळीकर, संतोष बढे, ए जी चौधरी, शर्मिला इनामदार
नाशिक
संदीप सोनवणे, संजय मोरे, प्रिती मोरे
अहमदनगर
वैशाली तोष्णीवाल, डॉ मनीषा चौरे
लातूर
रचना मालपाणी, डॉ विमल डोळे, डॉ प्रदीप पाटील, विनोद गिलडा, अशोक लोया, राजू गिरवलकर
परभणी
डॉ जयश्री कलानी, डॉ शिरीष कलमनुरीकर
नांदेड
डॉ नंदनवनकर
सोलापूर
अतुल कुलकर्णी
बेळगाव
संतोष ममदापुर
चेन्नई
डॉ संध्या दळे
ADORE Trust | Copyright 2021. All rights reserved | Contact: [email protected]
Designed by: Digital Canvas