चौदा किलो वजन कमी झाले, मधुमेह मुक्त झालो.
मी श्री. अरुण शिंदे, अंधेरी मुंबई महाराष्ट्राचा रहिवासी आहे.माझा सेलफ़ोन क्र. ७७१५८४३३६६, उंची ५ फूट ६ इंच, वय: ४८ वर्ष, ग्रुप: ९ EWL DM मी पेशाने सिविल व पैंटिंग व्यावयासाईक आहे.
माझे वैद्यकीय अहवाल असे होते:
तुलनात्मक काळ- १४ मार्च २०१८ ते १४ जून २०१८
१४ मार्च २०१८ रोजी-
वजन: ८८.६ किलो
HbA1C: ६.८
अनशेपोटी इन्सुलिन: ६.४
कमरेचा घेर: ४२ इंच
१४ एप्रिल २०१८ रोजी-
वजन: ८२ किलो
HbA1C: ६.३
अनशेपोटी इन्सुलिन: १०.५
कमरेचा घेर: ३८.५इंच
१४ जून २०१८ रोजी-
वजन: ७६.४ किलो
HbA1C: ६.०
अनशेपोटी इन्सुलिन: १७
कमरेचा घेर: ३६ इंच
९० दिवसात माझे १२.२ किलो वजन कमी झाले,HbA1C: ०.८ ने कमी झाले, अनशेपोटी इन्सुलिन: १०.५ ने वाढले, कमरेचा घेर ६ इंचानी कमी झाला.
चार महिन्यांच्या कालावधीत माझे वजन १४.४ किलो ने कमी झाले.
डॉ.दीक्षितांच्या व्याख्यानाचा विडिओ मी यु ट्यूब वर बघितला आणि आहार पालन सुरु केले. मी रोज १० किमी चालतो व दिवसा दोन वेळा जेवतो आणि मधील काळात फक्त पाणी पितो, सकाळी व रात्री काळा चहा घेतो. या आहाराचे पालन करून माझ्या पत्नीचे वजन १० किलो कमी झाले तर मुलाचे वजन ५ किलो कमी झाले.
मी डॉ. दीक्षित यांच्या सल्याने मधुमेहाची सर्व औषधे बंद केली आहेत.
आता मला उस्फुर्त आणि हलके वाटते. आता मी व माझा परिवार योग्य मार्गावर चालत आहोत.
मी डॉ. दीक्षित यांच्या अनमोल मार्गदर्शनासाठी त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा अत्यंत आभारी आहे.