मधुमेही अवस्थेतून मुक्त झालो, नउ किलो वजनही कमी झाले

नमस्कार!
मी मेघश्याम भोर
अवसरी खुर्द,मंचर(जि.पुणे)
मोबाईल नं-9096268990
मार्च 2018 या महीन्यात माझे वजन ९२ किलो होते व मला वयाच्या 28 व्या वर्षी डायबिटीस झाला आणि मी हादरुन गेलो त्यानंतर मी दीक्षित सरांच्या व्याख्यानाचा विडिओ नेटवर पाहिला आणि आमच्याच गावचे या अभियानात काम करणारे डाॅक्टर संतोष ढुमणे यांच्या मार्गदर्शनानुसार डाएट प्लॅन चालु केला. दिवसभरात मी चार-पाच वेळा खाणारा माणुस दोनच वेळेस जेवायचं म्हटल्यावर मला सुरूवातीला ८/१० दिवस अवघड गेले.पण हळुहळु मला सकाळी जेवल्यावर संध्याकाळी पण भुक लागायची कमी झाली, व सकाळ- संध्याकाळ ह्या दोनच वेळा मी सध्या जेवतोय.इतर वेळेस फक्त पाणीच! रोज पहाटे 50 मिनीटे चालणे व दोनदाच ५५ मिनीटात खाणे एवढीच गोष्ट मी गुढीपाडव्याच्या दिवसापासुन करतोय…
पण तेव्हापासुन माझ्या बाबतीत जबरदस्त रिझल्ट मिळाले. आत्ता माझे वजन 83 किलो असुन ते जवळ जवळ ९ किलो कमी झाले. कंबरेचा घेर 5 इंच कमी झालाय. तसेच माझे HbA1c 9.7 वरुन 6 वर आली आहे. माझी ३ महीन्याची Average Blood Glucose २४० वरुन १२५ वर आली आहे. तरी मी डाॅ.दीक्षित सर व या संपुर्ण टिमचे आभार मानतो. व मला एक जीवन जगण्याची जी नवी कला दाखवुन दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार!