हायपोथायरोइड आणि वेटलॉस, दोन्ही साठी लाभ झाला

pushpawati puri

नमस्कार 
माझे नाव पुषपावती पुरी, शिक्षिका
वय ५३
उंची १४५ सें मी
वजन ६६किलो

मी २३.१.१८ रोजी डाॅ दिक्षित यांचे व्याख्यान यू टयूबवर अभ्यासपूरवक ऐकले अन् तेव्हापासून जाणीव झाली की हेच आहार तंत्र नैसर्गिक व योग्य आहे.केवळ सुरूवातीला २-३ दिवस वेळेचा ताळमेळ बसवावा लागला. नंतर मात्र डाएट पाळणे सोपे झाले.

वजन कमी करणे हे सातत्याचे व आतापर्यंतचे सर्वात कठीण काम वाटायचे. आयुष्यभर चालणारे हे आव्हानातमक काम सतत चालू होते. आरोग्यदायी शक्य तितक्या चांगल्या सवयी पाळत होते.सगळया दिशेने सगळे प्रयत्न असायचे.वेगवेगळे डाएट, २ तासांनी खाणे,जिम,योगा सर्व करूनही फारसा फरक पडायचा नाही.भरीस भर म्हणून सहा वर्षांपूर्वी हायपोथाॅयराईडडचे निदान झाले मग तर अजून वजन वाढायला सुरूवात झाली. ६० किलोवरून ७२ पर्यंत पोहोचले होते शेवटीतर मी सर्व डाएट,जीम,चालणे बंद केले कारण काही फरकच पडत नव्हता.यामुळे मानसिक अस्वस्थता कायम होती.मनातलया मनांत देवाची प्रारथना करत होते की या परिस्थितीतून बाहेर पडायचा मार्ग दाखव परमेश्वराने माझे ऐकले आदरणीय डाॅ दिक्षित यांच्या रुपाने देवदूतच लाभले.आता मी खूप आनंदी – उत्साही व आरोगयाबाबत निश्चिंत आहे.आयुषयातला आरोग्याबाबतचा खूप मोठा संघर्ष संपला आहे आणि हा मार्ग चिरंतन राहणार आहे.डाएट सुर केल्यापासून माझ अवघ जीवन व जेवण दोन्हीही सुंदर बनलेत. माझे अहवाल असे आहेत.
२३.१.२०१८. २९.४.२०१८
TSH. १८.१५. ३.५४
HBA1c. ५.४०. ५.५०
FAST INS. २०.२०. १०.७०
कमर घेर. ११२से मी. १०२ से मी 
वजन. ७२ कि. ६६कि

आदरणीय स्व. डाॅ श्रीकांत जिचकर व आदरणीय डाॅ. दिक्षित यांची मी शतश: रुणी राहीन तसेच अरुण नावगे सर यांनीही वेळोवेळी मला मार्गदर्शन केले.या सर्व सेवाभावी कार्यास मदत करणारया सर्व टीमचे खूप खूप आभार. धन्यवाद